वसीम खोजन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती.
औसा (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक युवा नेते वसीम खोजन यांनी निलंगा वेस, औसा येथे सुरू केलेल्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते फित कापून उत्साहात संपन्न झाला. या कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या औसा नगर परिषद निवडणुकीत वसीम खोजन यांनी प्रस्थापितांविरुद्ध भाजपाच्या वतीने खंबीरपणे झुंज दिली होती. निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचट्टे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे, ज्येष्ठ नेते ॲड. अरविंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वसीम खोजन यांच्या कार्याचे कौतुक केले व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला महिला आघाडीच्या डॉ. ज्योतीताई बनसोडे, कल्पनाताई डांगे, सुनीता गुडबिले, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अक्रम खान पठाण, युवा नेते सुनील उटगे, नूतन जि.प. सदस्य संदिपान शेळके, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष रविकांत चिलमे, शहर अध्यक्ष शिवरुद्र मुरगे, आदम खान पठाण, पप्पूभाई शेख, इम्रान सय्यद, उमर पंजेशा, अकरम अली खोजन, बाबुभाई खोजन, सदानंद शेटे, बंडू कोद्रे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्य जनतेची कामे वेळेवर व्हावीत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने सुरू केलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी औसा शहरातील शेकडो नागरिक, महिला आणि युवक उपस्थित होते.वसीम खोजन यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या