स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ औशात वृक्षारोपण; जयश्रीताई उटगे यांच्या पुढाकाराने ‘हरित सुरुवात’
औसा : (प्रतिनिधी)
शहरातील स्वच्छता व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने सामाजिक भावनेतून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ औसा शहरातील मौलाना आझाद चौक परिसरात वृक्षारोपण करून ‘स्वच्छतेची हरित सुरुवात’ करण्यात आली.
“शहरातील स्वच्छतेची सुरुवात आपल्या परिसरापासूनच झाली पाहिजे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
या कार्यक्रमास औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर, राम कांबळे, नंदकुमार कोरंगळेकर, बनलाल शेख यांच्यासह मौलाना आझाद चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना जयश्रीताई उटगे म्हणाल्या की, “स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणी जपण्यासाठी वृक्षारोपणासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. शहराचे सुशोभीकरण आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवण्याची जबाबदारी घ्यावी.”
या उपक्रमामुळे मौलाना आझाद चौक परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या ‘हरित सुरुवातीचे’ स्वागत करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या