रमजान महिन्यात औसा शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेकडे निवेदन

 रमजान महिन्यात औसा शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेकडे निवेदन



रात्रीची वर्दळ, पाणीपुरवठा, स्वच्छता व प्रकाशव्यवस्थेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी

औसा प्रतिनिधी 

औसा : येणाऱ्या पवित्र रमजान महिनाच्या पार्श्वभूमीवर औसा शहरातील मुस्लिम नागरिकांना इबादत करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नगरपालिकेकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. रमजान महिन्यात रोजा, नमाज व रात्रीची तरावीह नमाजसाठी लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने मशिदींमध्ये ये-जा करतात. तसेच अनेक मुले सहेरी करून फजरची नमाज अदा करून विश्रांती घेतात. त्यामुळे शहरातील रात्रीच्या वेळेतील सुविधा सुरळीत असणे आवश्यक आहे.


या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी, नगर परिषद औसा यांना पुढील तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील सर्व खांबावरील स्ट्रीट लाईट सुरू ठेवावेत, रमजान महिन्यात नळाला पाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सोडावे, बंद असलेले बोअर सुरू करावेत, आरोग्याच्या दृष्टीने गटारीलगत मच्छर प्रतिबंधक पावडर टाकावी, नाल्यांची साफसफाई करावी तसेच शहरातील सर्व मशिदी परिसरात स्वच्छता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या असल्याने ती तातडीने सोडवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सतिष नाईक ते संतोष वर्मा परिसर, मोमीन गल्लीतील अलीम करपुडे ते वाजिद चौधरी परिसर तसेच दांडिया गल्लीतील २० ते २५ घरांना पाणीपुरवठा होत नसल्याने त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.


यावेळी मुख्याधिकारी यांनी नवीन पाईपलाईनच्या गुत्तेदारांशी दोन दिवसांत बैठक घेऊन समस्या शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच रमजान महिन्यात नागरिकांना इबादत करताना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


निवेदन देताना उमर भाई पंजेशा व मुजम्मील शेख (भारतीय जनता पार्टी, औसा) यांनी सांगितले की, आम्ही केवळ निवेदन देऊन थांबत नाही तर त्याचा नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करतो. औसा शहरातील जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सक्षम नेतृत्व आणि आमदार अभिमन्यु पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी सातत्याने काम केले जात आहे.त

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या