रोजगार सहाय्यकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे - आ.अभिमान्यू पवार
ग्रामरोजगार सेवकांशी संवाद साधताना आमदार पवार
ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार!
औसा प्रतिनिधी
ग्राम पंचायत स्तरावरील रोजगार हमी योजनेचा कणा असणारे रोजगार सहाय्यक असून त्यांच्या विविध प्रलंबित
मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या आंदोलनाला शेतरस्तांचे जनक आमदार अभिमान्यू पवार यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. रोजगार सहाय्यक यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार पवार यांनी रोजगार सहाय्यक यांच्या प्रलंबित मानधन प्रश्न, तसेच नियमित वेतन चुकीच्या पध्दतीने रोजगार सेवकांस काढण्यांची पध्दत बंद करावी,या प्रमुख मागण्यांची माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांचे महत्वाचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या आंदोलनालाही त्यांनी भेट दिली. ग्राम रोजगार सेवकांनी मानधन वाढ, प्रवास भत्ता, सेवेला स्थैर्य तसेच शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडल्या. या मागण्यांसंदर्भात चालू असलेल्या अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी रोजगार सेवक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अमोल वाकोडे,बाळासाहेबतायाडे,विनोद चव्हाण, राजेंद्र जिचकर,श्रावण बोकडे,सह अनेक जेष्ठ पदाधिकारी व औसा तालुक्यातील बालाजी रेड्डी, अंकुश जाधव,गोरख कांबळे, विठ्ठल पांचाळ, महेश कोळी, शिवराज कांबळे, चंद्रकांत जगताप , ज्ञानोबा काळे, नेताजी निकम,धनराज रणदिवे गजानन माळी, यांच्या सह राज्यातील असंख्य रोजगार सेवक उपस्थित होते

0 टिप्पण्या