पञकार राजू पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 पञकार राजू पाटील यांना 

जीवन गौरव पुरस्कार जाहीर 



औसा ( प्रतिनिधी ) 

औसा येथिल जेष्ठ पञकार तथा द रिंगण लाइव्ह चे संपादक श्री राजू पाटील यांना स्माँल आणि मिडियम न्युजपेपर्स असोसिएशन महाराष्ट्र, यांचा ' जीवन गौरव पुरस्कार ' जाहीर झाला आहे.

पञकारितेच्या क्षेत्रातील उत्तम आणि धाडसी कामगिरी बद्दल व पञकारितेतील दीर्घकालीन योगदाना बद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सदर संस्थेने म्हटले आहे.

येत्या 21 फेब्रुवारी रोजी, वरारा जिल्हा चंद्रपूर येथे हा पुरस्कार माजी मंञी श्री सुधीरभाऊ मनगु़ंटीवार यांच्या हस्ते व पञकारांच्या भव्य शिबीरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे निवेदन या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सरचिटणीस श्री ईश्वरसिंग सेंगर यांनी केले आहे. या निवडीबद्दल श्री राजू पाटील यांचे संपूर्ण मराठवाड्यातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या