बीबी रूखीयाचा 'संयम' मोठा! वयाच्या सातव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण..
औसा शहरात कौतुकाचा वर्षाव; १३ तास निर्जळ उपवास करत जपली परंपरा
औसा (प्रतिनिधी):
येथील नवी पेठ भागातील अवघ्या सात वर्षांच्या बीबी रूखीया सलीम मैंद या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने पूर्ण केला आहे. या चिमुकल्याने दाखवलेल्या संयमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. १९ फेब्रुवारी, गुरुवार रोजी पहाटे ५ वाजता 'सहरी' करून रूखीयाने आपल्या उपवासाला सुरुवात केली. दिवसभर पाणी किंवा अन्नाचा कणही न घेता त्याने तब्बल १३ तास रोजा पाळला. सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी इफ्तार करून त्याने आपला पहिला रोजा पूर्ण केला.
अवघ्या सातव्या वर्षांच्या वयात इतक्या चिकाटीने धर्माप्रती असलेली श्रद्धा पाहून मैंद कुटुंबासह परिसरातील नागरिक भारावून गेले आहेत.बीबी रूखीयाने हा पराक्रम केल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वयोवृद्धांनी या चिमुकल्याला भरभरून आशीर्वाद दिले असून, "अल्लाह या चिमुकल्याचे मनोबल अधिक दृढ करो आणि त्याचे उपवास स्वीकारो," अशी भावना व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या