औशातील ७ वर्षीय चिमुकल्याचा उपवास; यामीन हलसिंगे याने पूर्ण केला आयुष्यातील पहिला रोजा!
औसा प्रतिनिधी
इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण भक्तीभावात मग्न आहेत. याच उत्साहात औसा शहरातील पॉवर हाऊस भागातील ७ वर्षीय चिमुकला यामीन हलसिंगे याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत जिद्दीने पूर्ण केला आहे.
रमजानमध्ये साधारणपणे वयाच्या १० व्या वर्षापासून रोजा फर्ज (सक्तीचा) असतो. मात्र, घरातील मोठ्यांचे अनुकरण करत आणि या पवित्र महिन्याप्रती असलेल्या ओढीपोटी यामीनने वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी हा निर्णय घेतला. रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने पहाटे साडे सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजून 37 मिनाटाला असा तेरा तासाचा पहिला रोजा पूर्ण केला.
वाढत्या उष्णतेचा विचार करता मोठ्या माणसांनाही १३ तास पाणी न पिता राहणे कठीण जाते, अशा परिस्थितीत चिमुकल्या मुहम्मद यामीनने दिवसभर अन्न-पाण्याशिवाय राहून आपला रोजा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
यामीन हा आरिफ मज्जीद हलसिंगे यांचा पुत्र असून, त्याच्या या धैर्याबद्दल हलसिंगे परिवारात व मित्र परिवारात त्यांचे कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षाव होत होत आहे.

0 टिप्पण्या