भिम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या विभागीय मराठवाडा बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे - नांदेड जिल्हाप्रभारी प्रभाकर वाघमारे

 भिम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या विभागीय मराठवाडा बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे - नांदेड जिल्हाप्रभारी प्रभाकर वाघमारे 



नांदेड :- उध्दव सरोदे - 


आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ज्यामध्ये ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पंचायत,नगर परिषद नगरपालिका व महानगरपालिका आदिंच्या निवडणुका होणार असून याबाबत विशेष बैठक विषय उमेदवारांचे चाचणी समीक्षा आढावा बैठक जिल्हा कार्यकारणी आणि पक्ष बांधणे समीक्षा बैठक भीम आर्मी व आजाद समाज पार्टीची मराठवाडा विभागीय बैठक ही ता.१९ शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केली आहे.

या विशेष बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि विशेष उपस्थिती म्हणून पार्टीचे  केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र राज्य मा.गौरी प्रसाद उपासक, महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.रुपेशजी बागेश्वर,संयोजक आजाद समाज पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा मराठवाडा प्रभारी सत्यजित साळवे,मा.किशोरजी मस्के महाराष्ट्र सचिव,बलराज दाभाडे मराठवाडा अध्यक्ष,बैठकीचे आयोजक अशोक वाळवळ,मराठवाडा उपाध्यक्ष आजाद समाज पार्टी  नांदेड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष विनायकजी लोहकरे,नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष मा.किरणजी सदावर्ते,नांदेड जिल्हा महासचिव गोविंद चाटसे,सचिव किशोर जोंधळे, देवानंद जोंधळे,संतोष जोंधळे व सर्व तालुका विधानसभा सेक्टर बुथचे सर्व पदाधिकारी ए.एस.पी.युनिट नांदेड आदि सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान भिम आर्मी व आजाद समाज पार्टीचे तरूण तडफदार,जिद्दी, मेहनती,अभ्यासू नांदेड जिल्हा प्रभारी प्रभाकरराव वाघमारे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या