शेतकरी व जनतेच्या जीवांसाठी काँग्रेस पक्षाचा अर्धापूर तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा

 शेतकरी व जनतेच्या जीवांसाठी काँग्रेस पक्षाचा अर्धापूर तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा 



ओला दुष्काळ,कर्जमाफी जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा,पप्पू पाटील कोंढेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला महामोर्चा 


अर्धापूर :- उध्दव सरोदे - 


ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूर, सातारा,सांगलीच्या धर्तीवर तात्काळ आर्थिक मदत करा अन्यथा खुर्च्या खाली कर या व ईतर नारेबाजी सहित विविध मागण्यांचा महामोर्चा अर्धापूर काँग्रेस पक्षाकडून तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्री,देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. भोकर विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे लाडके युवानेते व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला. अर्धापूर तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या महाभयंकर अतिवृष्टीमुळे व अति पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यात तालुक्यातील सर्वच शेती जलमय झाली असून अति पावसामुळे जमिनी खरडून गेल्या असून शेतातील काळी माती पण वाहून गेली आहे. शासनाकडून शेतकन्यांना जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूर, सातारा व सांगलीच्या धर्तीवर आर्थिक मदत देण्यात यावी,तात्काळ सरसकट कर्जमाफी,ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,केळी उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे तात्काळ अनुदान देण्यात यावे,यापूर्वी व नुकतीच एका तरूण शेतकऱ्यांने आत्महत्या केली या सर्वांना तात्काळ आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवानेते पप्पू पाटील कोंढेकर, कॉग्रेसचे अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनिल वानखेडे,माजी सभापती पप्पू बेग, तालुका प्रभारी डॉ.उत्तमराव इंगळे, मा.जि.परिषद सदस्य प्रल्हादराव सोळंके,कार्याध्यक्ष बालासाहेब देशमुख आंबेगांवकर,नांदेड़ कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्ञानेश्वर पाटील राजेगोरे,माजी सरपंच सदाशिवराव देशमुख,मदन देशमुख, प्रवक्ते सुभाष लोणे,सदाशिव पाटील कपाटे,बळीराम पाटील हाट्टेकर, सचिव शेख मकसूद,उपाध्यक्ष शेरू पठाण,गजानन मुळे,मनोज कदम, युवकचे शहराध्यक्ष रविंद्र पाटील डाढाळे,मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष अॅड.नितेश लोणे,शहराध्यक्ष अॅड.गौरव सरोदे,शहर कार्याध्यक्ष भिमराव सरोदे पेंटर,मा.नगरसेवक प्रकाश सरोदे,अॅड.मंगेश सरोदे, युवकचे महेंद्र सरोदे,नागेंद्र जोंधळे, संतोष कपाटे,बाळू मरकुंदे,बाळू पाटील चाभरेकर,मिर्झा अबुजरउल्ला बेग,अल्पसंख्याक सेलचे म.गौस कुरेशी,अर्जुन गाढे,मंगेश धुमाळ, दत्तराव देशमुख लहानकर,शबाना बेगम,पृथ्वीराज लोणे,बालाजी स्वामी,साईनाथ जाधव,अरविंद पाटील क्षिरसागर,केशवराव मुधोळ, मोहम्मद इब्राहिम,शादुल नागेलीकर, फिरदौस पठाण,महंमद अय्याज, मुन्नाभाऊ देशमुख,भागवत कदम, रंजीत देशमुख,मारोतराव दुधमल, युवकचे फेरोज पठाण,बेगाजी मरकुंदे,कैलास कपाटे,गणेश क्षिरसागर,ज्ञानदेव देविदास,बालाजी देवराव यांच्यासह अर्धापूर शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या