आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर वरून कानपुर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा औशात निषेध मोर्चा..

 आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर वरून कानपुर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा औशात निषेध मोर्चा..






 

औसा प्रतिनिधी 

औसा -उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथे ईद मिलादुन्न नबीच्या जुलूस दरम्यान आय लव्ह मुहम्मद असे लिहिलेले बॅनर प्रदर्शित केल्या कारणाने कानपूर उत्तरप्रदेश येथील पोलीसांनी मुस्लीम समाजाच्या व्यक्तींवर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेऊन सूडबुध्दीने गुन्हा दाखल करणार्या पोलीस कर्मचारी व संबधीत अधिकारी यांना नौकरीतून बडतर्फ करण्याची मागणीचे निवेदन औसा येथिल औलीया ईकराम च्या व समस्त मुस्लिम समाजाच्या वतिने औसा तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले.


दिनांक ०९/०९/२०२५ रोजी उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर येथे ईद मिलादुन्न नबीच्या जुलूस दरम्यान आय लव्ह मुहम्मद असे लिहिलेले बॅनर जुलूस मध्ये प्रदर्शित केल्यामुळे धार्मीक द्वेषातून कानपूर (UP) येथील पोलीस प्रशासनाने मुस्लीम समाजाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय संवीधानाने प्रत्येकाला ज्याच्या


त्याच्या धर्माचे पालन करण्याचे अधिकार दिलेले आहे, ईद मिलादुन्न नबीच्या जुलूस दरम्यान आय लव्ह मुहम्मद असे लिहिलेले बॅनर जुलूस मध्ये 


सदरचा गुन्हा हा धार्मीक द्वेषातून कानपुर (UP) येथील  पोलीस प्रशासनाने मुस्लीम समाजाच्या व्यक्तींवर दाखल केला आहे.


त्यांचे कृत्य हे संवीधान व देशाच्या एकात्मेच्या विरुद्ध असून मुस्लीम समाजाच्या लोकांच्या भावना दुःखावल्या आहेत असे मनोगत व्यक्त करून त्या घटनेचा नोंदवला व समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार घनश्याम आडसुळ यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती साहेबांना पाठविण्यात आले.या मोर्चात ..

 हजारोंच्या संख्येने युवकांचा सहभाग होता मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांनी चौख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या