कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
औसा - प्रतिनिधी
आमदार अभिमन्यु पवार यांच्या मार्गदर्शना खाली वाटचाल करीत असलेल्या औसा कृषि उत्पन्न बाजार समितीची सन 2024 - 2025 ची सर्वसाधारण सभा दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाली. या सभेचे सुरवातीला बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे व उपसभापती भिमाशंकरप्पा राचट्टे, संतशिरोमणी मारोती महाराज सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, बाबासाहेब पाटील, प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी बाजार समितीचे संचालक प्रकाश काकडे, युवराज बिराजदार, संदीपान लंगर, प्रविण कोपरकर, रमेश वळके, गोविद भोसले, ईश्वर कुलकर्णी, वीर, झिरमिरे, सुरेशऔटी, धनराज जाधव, मोहन कावळे आलमला, वि.का. सो.चेअरमन विश्वनाथ बिराजदार, अडत असोसिएशन चे अध्यक्ष शिवलींगप्पा औटी, उपाध्यक्ष गोविंद दळवे, आदींनी दिपप्रज्वलन झाले, नंतर अहवाल वर्षात आजपर्यंत ज्ञात अज्ञात त्या सर्वांना अभिवादन करुन त्यांच्या दु:खात सहभागी होऊन बाजार समिती तर्फे मौन पाळुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या नंतर बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे यांनी प्रास्ताविक व आहवाल वाचन केले. यानंतर सभेच अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे यांनी मा.आमदार अभिमन्यु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने केलेली विकास कामाची व संचालक मंडळाच्या कालावधीत केलेल्या शेतक-यासाठी केलेल्या लोकभिमुख व पारदर्शक कारभारची माहिती दिली, व पुढील काळात करावयाच्या विकास कामाची माहिती दिली व बाजार समितीच्या वतीने लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने अंतर्गत नवीन शेतकरी भवन व ईतर सुविधा ईमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगीतले. तसेच बाजार आवारातील उर्वरीत सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे व सौर पथदिवे व शेतमाल तारण योजनेसाठी 1000 मे. टनाचे गोदाम बांधण्यात येणार असल्याचे ही सांगीतले. याप्रसंगी वार्षिक सभेला सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, प्रतिनिधी, ग्राम पंचायत सरपंच तथा प्रतिनिधी आडते / व्यापारी व हमाल ,तालुक्यातील शेतकरी तसेच बाजार समितीचे सर्व अडते व व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी वसिम शेख, भुजंग सोमवंशी, महादेव कांबळे, रामेश्वर विभूते आदी उपस्थित होते, तर आभार बाजार समितीचे संचालक गोविंद भेासले यांनी मांडले .

0 टिप्पण्या