औसा तालुका दुष्काळ जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरीव मदत करा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमीनीचे खरडून जाऊन अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने सरसगट पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार व ज्यांच्या जमीनीतील माती वाहुन गेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन पुनश्च जमीन लागवडी योग्य होण्यासाठी भरीव अर्थसहाय्य करावे. त्याचबरोबर घरांमध्ये पाणी शिरुन व पावसामुळे घराची झालेली पडझड याचासुध्दा पंचनामा करुन नुकसानग्रस्त लोकांना शासनाने भरीव मदत करावी त्याचबरोबर शेतातील गोठे पशुधन यांचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठीसुध्दा शासनाने भरीव मदत करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औसा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख,युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले, तालुकाध्यक्ष शामराव साळुंखे पाटील, शहराध्यक्ष शेख सनाऊल्ला दारुवाले, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, युवा शहराध्यक्ष मारूफ शेख, अशोक गरड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या