शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रतक्षात बांधावर जाऊन पहाणी करून न्याय मिळवून देणार ... जिल्हा अध्यक्ष अभय दादा साळुंके
पत्रकार परिषदेत दिली माहिती
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यासह संपुर्ण जिल्हा भरात ओला दुष्काळ ची गडद छाया पसरली असून सत्तेवर असणाऱ्या पक्ष व अधिकारी यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकरी संकटात असताना सरकाराने मदत करणे गरजेचे आहे.परंतु तसे होताना दिसत नाही.त्यामुळे लातूर जिल्हा काँग्रेस पार्टी तर्फे दुष्काळ व्यवस्थापन व मदत केंद्र नावाने एक जिल्हा स्तरावरून समितीची स्थापना माजी मंत्री आ अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार काँग्रेस भवन लातूर येथे स्थापन केलेली आहे. त्यामध्ये शरद देशमुख हे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळांना एक निरीक्षक नेमणूक करण्यात आला असून हा निरीक्षक प्रत्येक महसूल मंडळातील प्रत्येक गावात उद्या सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसात भेट देऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील अशा पद्धतीने सर्व महसूल मंडळापर्यंत जाऊन आलेल्या भिषन संकटांमध्ये शेतकऱ्यांना धीर आणि देत जनलढा उभा करून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतील. आज पर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही पक्षांने या प्रकारची यंत्रणा उभी केली नव्हती ती यंत्रणा लातूर जिल्हा काँग्रेस उभी केली असून प्रत्यक्षात बांधावर जाऊन शासनाची मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे संघर्ष करण्याची भूमिका घेतली असून माध्यमांच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. कि जोपर्यंत शेतकरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करण्यात येईल.असा इशारा हि त्यांनी याप्रसंगी दिला.पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला पाणी लागून मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे आमचे सर्व निरीक्षक दोन दिवसात प्रत्येक गावात भेटून अहवाल सादर करतील.मग आम्ही तीव्र आंदोलन करून न्याय मिळवून देऊ.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रति एकर तर फळबागेला दीड लाख रुपये मदत दिली तर संकटात सापडलेल्या दिली तरच शेतकरी संकटातून उभा राहू शकेल.त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रचनात्मक संघर्ष व मोर्चे काढून न्याय मिळवून देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीशैल्यदादा उटगे ,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे,लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके,औसा विधानसभा काँग्रेस पक्ष प्रभारी डॉ.श्रावण रॅपनवाड,औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी महिला तालुकाध्यक्ष सईताई गौरे, शहराध्यक्ष अजहर हाश्मी,कार्याध्यक्ष खुनमीर मुल्ला मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हा चेअरमन सचीन पाटील,माजी चेअरमन गणपत बाजुळगे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 टिप्पण्या