नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा उद्धव ठाकरे यांची मागणी
औसा प्रतिनिधी
संपूर्ण मराठवाड्यामध्ये मागील पंधरा दिवसापासून अतिवृष्टीने कहर झाला असून शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली असून शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाने खरडून गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पीकही नाही आणि मातीही नाही अशा दैनिया अवस्थेत सापडलेला शेतकऱ्याला उभारी घेणे शक्य नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली दिनांक 25 सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील काटगाव येथील दुष्काळग्रस्त व अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून प्रतिहेक्टरी आठ हजार पाचशे रुपये देण्यात येत असलेले आर्थिक मदत अतिशय तोकडी आहे इतक्या तुटपुंज्या रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची दुरुस्ती ही करता येणार नाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संपूर्णतः कोलमडला असून संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी व सामान्य जनतेची अडचण व गांभीर्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त मदत करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे असे शेवटी स्पष्ट केले अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करीत असताना त्यांच्यासोबत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओम प्रकाश निंबाळकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते धाराशिव चे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी अत्यंत धाडसाने पाण्यात सापडलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत असताना केलेले धाडस हे कौतुकास पात्र आहे असे सांगून जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा खासदार तुम्हाला मिळाला आहे असे सांगितले काटगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व ग्रामस्थांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला

0 टिप्पण्या