काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मधुमेह व रक्तदाब शिबिराचे आयोजन..

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मधुमेह व रक्तदाब शिबिराचे आयोजन..


औसा प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा येथे रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता मधुमेह व रक्तदाब मुक्त जीवन जगण्यासाठी मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अंतर्गत मार्गदर्शन चर्चा सत्र व औषध उपचार शिबिराच्या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनिता पाटील ग्रामीण रुग्णालय औसा व प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर चांद पटेल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. निरोगी जीवनशैली साठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे असून इच्छुकांनी सकाळी आठ पासून आपली नोंदणी करावी व उपाशीपोटी तसेच मॅडम तपासणी करण्यात येणार आहेत. मधुमेह व रक्तदाब मधुमेह रक्तदाब याबाबत उपचार घेणाऱ्या रुग्णांनी जुनी फाईल सोबत घेऊन यावे आणि या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक अमोल खानापुरे प्रदेश सरचिटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या