औशातील साठ वर्षीय वयोवृद्धाने केले सहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे.
भादा पोलिसांत गुन्हा दाखल
औसा प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे भादा गावाजवळ असलेल्या शिंदेवाडी येथे साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने शिकवणीच्या नावाखाली घरात कोणी नसल्याचे पाहून एका सहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी भादा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रविवार सुट्टी असतानाही एक अनोळखी व्यक्ती मौजे शिंदेवाडी येथे येऊन रस्त्यावर खेळत असलेल्या एका मुलीला तुला शिकवतो म्हणून घरी घेऊन आला व घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेऊन त्या मुली सोबत अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरडा केला असता जवळच असलेल्या शेजाऱ्याने ते पाहिले व त्या व्यक्तीला विचारपूस केल्यानंतर उडवा उडवी चे उत्तरे देऊ लागला. ज्यावेळेस त्या ठिकाणी गावातील जमाव जमा झाला त्यावेळी त्याने अश्लील चाळे केल्याचे कुबूल केले.मला जाऊद्या मी काहीही केले नाही असे म्हणणार्या आरोपी किशन बन्सीलाल कोलते याने ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या ठिकाणच्या महिलांनी याला पोलिसांच्या हवाली करा असे सांगितले. तेव्हा तेथे जमलेल्या व्यक्तींपैकी एकाने पोलीस स्टेशन येथील पीएसआय पाटील यांना फोन करून सविस्तर माहिती सांगितली ड्युटीवर दुसरीकडे पट्रोलिंग साठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी पाठवून त्याला तेथून तात्काळ उचलले व पोलीस स्टेशन येथे घेऊन आल्यानंतर विचारपूस केली व झालेली घटना खरी किंवा खोटी हे विचारपूस केली करण्यासाठी पोलीस संबंधित मुलीच्या भेटीसाठी गेल्यानंतर मुलीने आपल्यासोबत अश्लील चाळे केल्याचे पोलिसांना सांगितले. सदर व्यक्तीचा पत्ता औसा येथील होळकर नगर येथील कळुन आला.
गुन्हा घडल्यानंतर बराच वेळ गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिाया चालू होती.
शिकवणीच्या नावाखाली असला गोरख धंदा करणाऱ्या व्यक्तीला मोठी शिक्षा करा असे म्हणत पोलीस स्टेशन येथे मोठा जमाव जमा झाला होता.
सरपंच मीना दरेकर यांचे पती हानमंत दरेकर स्वतः त्या ठिकाणी आले व त्यांनी या व्यक्तीला अटक करण्यास भाग पाडले व या व्यक्तीस मोठी शिक्षा द्या असे पोलिसांना विनंती केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
यातील पिडीत बालिका वय 06 वर्षे हिस शिकवणीच्या बहाण्याने तिचे घरी येउन यातील आरोपीने घरात कोणी नसताना वाईट उददेशाने पिडीत बालीकेच्या अंगावर बसून तिच्या शरीरावर इकडे तिकडे हात लावून तिचा विनयभंग केला वगैरे मजकुरचे फिर्याद वरून गुरनं 168/2025 कलम 74,75(1) BNS सह कलम 8,12 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अन्वये सपोनि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी पोउनि पाटील सो यांचेकडे देण्यात आला.
0 टिप्पण्या