अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; दिव्यांग भव्य क्रांती संघटनेची औसा तालुक्यात सरसगट नुकसान भरपाईची मागणी

 अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; दिव्यांग भव्य क्रांती संघटनेची औसा तालुक्यात सरसगट नुकसान भरपाईची मागणी




औसा, प्रतिनिधी |


 दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत औसा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तूर, मूग, उडीद व सोयाबीन या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.


या पार्श्वभूमीवर दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार औसा यांना निवेदन सादर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच, पीक पंचनामे तातडीने सुरू करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम मिरकले, सूर्यकांत पवार, नामदेव पवार, गजानन गवळी, गजेंद्र रोंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, "नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची दखल प्रशासनाने घेणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान संकटात सापडले असून, शासनाने त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा."


शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या