हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त औशात विविध कार्यक्रम संपन्न.
औसा प्रतिनिधी
औसा;
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी औसा येथे सामाजिक व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या विविध उपक्रमांमध्ये औसा येथे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सकाळी 8 वाजता ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर येथे महाअभिषेक व 9 वाजता हजरत खाकी शफा दर्गा येथे चादर चडविणे,व त्यानंतर 10 वाजता समता नगर येथील बुध्द वंदना,त्रिरत्न बुद्ध विहार व तसेच चक्रधर शाळा येथे वृक्षारोपण,व त्यानंतर कुमारस्वामी महाविद्यालय, औसा येथे डायबिटीस व रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्यानंतर सायंकाळी गणेश आरती व भक्तांना प्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रम औसा तालुका कॉग्रेस कमिटी व औसा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. औसा येथिल श्री कुमार स्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात मधुमेह व रक्तदाब तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर चांद पटेल आणि औसा येथिल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आयुष्यामध्ये आरोग्याला महत्व देणे आवश्यक असून आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळेत उपचार घेणे आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे रोगाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिक्रिया मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.औसा येथिल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ विकास पाटील व इतर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मधुमेह व रक्तदाब तपासणी व उपचारासाठी मोलाचे सहकार्य केले. या शिबिराचे मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे या संकल्पनेतून आयोजित शिबिरासाठी प्रमुख पाहूणे म्हणून कॉग्रेस कमिटी चे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीशैल्य उटगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायणराव लोखंडे,माजी सभापती अमरसिंह भोसले, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी,शहराध्यक्ष अजहर हाश्मी,माजी शहराध्यक्ष शकील शेख,नारायण आबा लोखंडे,दिपक राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे शहराध्यक्ष शेख सनाऊल्ला दारुवाले,डॉ.भातांब्रे,औसा ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ सुनीता पाटील, मधुमेह विकार तज्ञ, लातूर डॉ.चांद पटेल,व औसा शहर व तालुका कॉग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या