हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त औशात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
औसा प्रतिनिधी
औसा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, ३१ ऑगस्ट रोजी औसा येथे विविध सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. औसा तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेस कमिटीने दिवसभर आयोजित केलेल्या या उपक्रमांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, आणि धार्मिक कार्यक्रम यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता औशाचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिरात महाअभिषेकाने झाली. त्यानंतर हजरत खाकी शफा दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली. सकाळी १० वाजता समता नगर येथील बुद्ध वंदना, त्रिरत्न बुद्ध विहार आणि चक्रधर शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. याचवेळी श्री कुमार स्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात मधुमेह, रक्तदाब आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधोपचारही देण्यात आले.
या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. चांद पटेल आणि औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील यांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात आरोग्याची काळजी घेणे, वेळेवर उपचार घेणे आणि भविष्यात रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरासाठी औसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पाटील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
सायंकाळी गणेश आरती आणि भक्तांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीशैल्य उटगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायणराव लोखंडे, माजी सभापती अमरसिंह भोसले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, शहराध्यक्ष अजहर हाश्मी, माजी शहराध्यक्ष शकील शेख, नारायण आबा लोखंडे, दीपक राठोड, आदमखां पठाण, हमीद सय्यद, पाशाभाई शेख, पवन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष शेख सनाउल्ला दारूवाले, खुंदमीर मुल्ला, खाजाभाई शेख, मुज्जमील शेख, सय्यद खादर, सुलतान शेख, न्यामत लोहारे, हमीद सर, शब्बीर शेख, ॲड. फैय्याज पटेल, जयराज कसबे, डॉ. भातांब्रे, डॉ. सुनीता पाटील, आणि डॉ. चांद पटेल यांचा समावेश होता.
औसा शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या