स्वर्गीय दिगंबर माळी यांना अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार..
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेचे दिवंगत उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सक्रिय कार्यात असलेले स्वर्गीय दिगंबर हरिबा माळी यांना लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती समिती नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्वर्गीय दिगंबर माळी यांची कन्या अश्विनी यांनी स्वीकारला आपल्या हयातीमध्ये दिगंबर माळी येणे केलेल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष पवार, जयंती समितीचे अध्यक्ष विनोद धर्म जाधव,
कमलेश गायकवाड, महिला संपर्कप्रमुख कल्पना गायकवाड, सुरज शिंदे यांच्यासह जयंती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या