औसा शहरातील प्रभाग ५ मधील गटारीचा प्रश्न सुटला; उमर भाई पंजेशा यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा

 औसा शहरातील प्रभाग ५ मधील गटारीचा प्रश्न सुटला; उमर भाई पंजेशा यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा






औसा प्रतिनिधी 


औसा – शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील रहिवाशांना अनेक महिन्यांपासून भेडसावणाऱ्या तुंबलेल्या गटारीच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते उमर भाई पंजेशा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेत तातडीने उपाययोजना केली, ज्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


कुरेश मस्जिद ते वहिद चाऊस यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि काजी गल्लीतील रसूल पठाण यांच्या घरासमोरील नाल्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून गटारीचे पाणी साचत होते. यामुळे रस्ते पाण्याखाली जाऊन नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत होत्या. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्याही वाढण्याची भीती होती.


या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून उमर भाई पंजेशा यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि स्वच्छता विभागाशी वेळोवेळी संपर्क साधला. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. स्वच्छता निरीक्षक श्री. गोरे यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ कर्मचाऱ्यांच्या टीमने गटारीची पूर्णपणे साफसफाई केली.

 आणि कर्मचाऱ्यांनी रस्ते खोदून साचलेले पाणी बाहेर काढले आणि बंद झालेली नाली  लोखंडी पाइपलाइन टाकून पुन्हा दुरुस्त केली. या कामामुळे परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी पूर्णपणे दूर झाली आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी गेल्याने नागरिकांना स्वच्छ व मोकळा रस्ता मिळाला आहे, ज्यामुळे परिसरातील वातावरण पुन्हा एकदा आरोग्यदायी झाले आहे.

नागरिकांकडून आभार

या कामामुळे परिसरातील रहिवाशांनी उमर भाई पंजेशा यांचे विशेष आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले, "हे काम वेळेवर झाले नसते तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या." नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन, मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक श्री. गोरे यांच्या तत्परतेबद्दलही समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या