मुलींची बाजी! लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचा 87% निकाल – गुणवंत विद्यार्थिनींनी मिळवली विद्यापीठात चमक

 मुलींची बाजी!

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचा 87% निकाल – गुणवंत विद्यार्थिनींनी मिळवली विद्यापीठात चमक



हासेगाव (ता. औसा, जि. लातूर) – श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था, लातूर संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव येथील बी. फार्मसी प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात मुलींनी बाजी मारत 87 टक्के निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले असून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपलं स्थान नोंदवलं आहे.

महाविद्यालयातून प्रथम क्रमांक: कु. टरके श्रद्धा मनोहर – 8.10 CGPA, द्वितीय क्रमांक: कु. टरके निकिता दत्ता – 8.02 CGPA आणि तृतीय क्रमांक: कु. गरड गीतांजली दौलत – 7.88 CGPA या विद्यार्थिनींच्या यशामागे संस्थेचे प्रेरणादायी मार्गदर्शन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थिनींची मेहनत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भीमाशंकर गुरुनाथअप्पा बावगे, सचिव श्री. वेताळेश्वर भीमाशंकर बावगे, तसेच प्राचार्य डॉ. नितीन लोणीकर सर व प्राध्यापकवर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या