लातूरला होणार राज्य राखीव पोलीस दल गट कार्यान्वित.

 लातूरला होणार राज्य राखीव पोलीस दल गट कार्यान्वित. 




आ अभिमन्यू पवारांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वतः मंजुरी 


औसा - आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीत लातूर, धाराशिव, बीड व नांदेड जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट मंजूर करुन कार्यान्वित करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यासंदर्भात मंजुरीसाठी सकारात्मक प्रस्ताव प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग यांना दिले होते. याबाबत राज्य राखीव पोलीस दल गटाला तत्तवता मंजूरी देण्यात आली आहे. 




        लातूर हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी व देश विघातक कार्यवाहीत सहभागी असलेल्या अतिरेकी कनेक्शन समोर आले होते. तसेच लातूर जिल्ह्यातगत कर्नाटक सीमा असल्याने व वेळेवेळी होणाऱ्या महाराष्ट्रातील आंदोलनाच्या घटनेमुळे लातूर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा झाला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कांही घटना घडल्यास नजीकचे जालना येथील राज्य राखीव पोलीस दल २८० किलोमीटर असून त्यांना पोहचण्यासाठी किमान ५ ते ६ तास तर सोलापूर येथील राज्य राखीव पोलीस दल हे जवळपास १२५ किमी अंतरावर असून त्यांना लातूर येथे पोहंचण्यासाठी किमान ३ तास लागतात तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दल अपुरे पडणार आहे. लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड येथे राज्य राखीव पोलीस दल गट नसल्याने तसेच या जिल्ह्यांना अंतराच्या दृष्टीने लातूर हे जवळचे आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट मंजूर करून कार्यान्वित करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.याचीही माहिती आ अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत लातूर, धाराशिव, नांदेड, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत निर्माण झालेली स्थिती तत्परतेने नियंत्रणात आणण्यासाठी लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट मंजूर करून कार्यान्वित करण्याबाबत मागणी केली आहे. यासंदर्भात मंजुरीसाठी सकारात्मक प्रस्ताव प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग यांना दिले असता सदरील राज्य राखीव पोलीस दल गटाला तत्तवता मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी आमदार पवार यांनी लातूर विमानतळाच्या विषयाचा पाठपुरावा केला असता पुढील दोन वर्षांमध्ये लातूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल हे उद्दिष्ट समोर ठेवून विमानतळाचा विकास केला जाईल असा शब्द  मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.


..................... 


मुख्यमंत्र्यांसोबत विषयांसंदर्भात चर्चा 




लातूर ते कल्याण महामार्ग सध्या प्रस्तावित आहे पण या महामार्गावरील वाहनांना पुढे कल्याण वरुन मुंबईला जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यात बदल करुन लातूर - अहिल्यानगर - माळशेज घाट मार्गे बदलापूर - वडोदरा एक्स्प्रेस वे वरील बोगद्यातून पनवेल जेएनपीटी असा महामार्ग मंजूर करण्यात यावा अशी मागणी आ अभिमन्यू पवार यांनी केली, तपासून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या आहेत.तसेच यावेळी  औसा मतदारसंघातील बेलकुंड उपसा जलसिंचन योजना, औसा शहर विकास आराखडा, भूकंपग्रस्त गावांचा पुनर्विकास आराखडा सह विविध विषयांचा पाठपुरावा केला असता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच विषय कालबध्द पद्धतीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे उपस्थित होते.


......................


एकंदरीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुष्टीने व जिल्ह्य़ातील अपुरे पोलीस संख्या बळ पाहता लातूरला एसआरपीएफ गट स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती याबाबत मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरीही दिली असून जिल्ह्य़ात राज्य राखीव पोलीस दल गट कार्यान्वित होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या