दरोड्याच्या तयारीत असलेले 5 आरोपी जेरबंद ; औसा पोलिसांची मोठी कारवाई; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त...

 दरोड्याच्या तयारीत असलेले 5 आरोपी जेरबंद ;

औसा पोलिसांची मोठी कारवाई; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त...




औसा प्रतिनिधी 

 औसा पोलिसांकडून 

लातूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या घरफोडी आणि दुकाने फोडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, आणि अहमदपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची गस्त व नाकाबंदी वाढवण्यात आली होती. यासाठी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, २ ऑगस्ट, २०२५ रोजी पहाटे औसा तालुक्यातील शिवली मोड आणि सिंदाळा परिसरात एक संशयित मालवाहू चारचाकी वाहन फिरत असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे औसा आणि भादा पोलीस ठाण्यांच्या पथकांनी नागरिकांच्या मदतीने शिवली मोड येथे या वाहनाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान, वाहनातील तिघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर पाच आरोपींना पोलिसांनी पकडले. चौकशीत त्या

पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून एमएच ४४ यू ३२९८ क्रमांकाचा अशोक लिलॉड टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोची तपासणी केली असता, त्यात दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये एक लोखंडी कोयता, एक धारदार चाकू, दोन लाकडी दांडके, दोन लोखंडी कटावणी, स्टील रॉड, चौकोनी स्टीलचा पाईप, दोन लोखंडी पाईप, बनावट नंबर प्लेट, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी साखळी आणि एक ग्राइंडर मशीनसह एकूण ७ लाख ७१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये आणि राज्यामध्येही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भादा पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात गुरन . 155/25 भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४) आणि ३१०(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड (औसा), सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव (भादा), पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर , रामकिशन गुट्टे,हानमंत पडिले, जमादार मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, योगेश भंडे, सचिन गुंड,भागवत गोमारे, सुर्यकांत मगर, सर्व नेमणूक पोलिस ठाणे औसा आणि राठोड पोकॉ /नेमणूक पोलिस ठाणे भादा आदिनी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके करत आहेत.अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी औसा पोलिस स्टेशन येथे पत्रकार परिषदेत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या