भादेकर भूमिपुत्र डॉ. व्यंकट घोडके यांना "इंडस्ट्री कोल्याबोरेशन एक्सलन्स" पुरस्काराणे सन्मानीत, अभिनंदनाचा वर्षाव...
औसा:एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकट घोडके यांना HR–TPO लीडरशिप समिट २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत "इंडस्ट्री कोलेबोरेशन एक्सलन्स" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही परिषद मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या एशियन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डटेक अॅण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट (IIBHM) या संस्थेद्वारे हॉटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.
उद्योग व शिक्षण क्षेत्र यामधील प्रभावी संवाद आणि यशस्वी सहकार्य स्थापन करण्यामध्ये डॉ. घोडके यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची ही पावती आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांचे हे मान्यतास्वरूप आहे.
एआयएसएसएमएस आयओआयटी, पुणे संस्थेचे प्राचार्य, व्यवस्थापन, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी यांच्या वतीने डॉ. व्यंकट घोडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी समाज माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 टिप्पण्या