औसा गट विकास अधिकारी आनंद मिरगणे यांच्याकडून घरकुलची पाहणी

 औसा गट विकास अधिकारी आनंद मिरगणे यांच्याकडून घरकुलची पाहणी 


औसा प्रतिनिधी 

औसा: तालुक्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा जीवन आधार असणारे शासकीय योजना म्हणजे "घरकुल" या घरकुलामुळे अनेक संसार सुव्यवस्थीत चालण्यासाठी मदत होणारी योजना असून हे घरकुल योजनाही सर्व योजनापेक्षा अत्यंत महत्त्वाची असणारी जिव्हाळ्याची योजना आहे.कारण यामुळे सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मानवी जीवनाचा निवाऱ्याचा प्रश्न संपुष्टात आणणारी योजना आहे.यामुळे ही योजना तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे याचा लाभ योग्य व्यक्तीलाच मिळाला पाहिजे, योजना राबविली पाहिजे ही खबरदारी घेण्याकरिता औशाचे नूतन गटविकास अधिकारी आ.मिरगणे यांनी लामजना गावांमध्ये जाऊन पाहणी केली.यावेळी त्या गावांमध्ये प्रत्यक्ष लाभ घेणारे लाभार्थी कशा पद्धतीने त्या येणाऱ्या तुटपुंज्या शासकीय रकमेचे नियोजन करून आपल्या कुटुंबाला आयुष्याचा निवारा प्राप्त व्हावा याकरिता या महागाईच्या काळात काटकसर,इतर रकमेची व्यवस्था करून त्या योजनेचा पुरेपूर लाभ घेत असल्याची संपूर्ण माहिती गटविकास अधिकारी आनंद मिरगणे यांनी गावातील लाभार्थी यांची भेट घेतली. 

या पाहणीमध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजना रमाई घरकुल आवास योजना अशा विविध योजनांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली.औसा तालुक्यात घरकुल योजना बाबत दक्षता घेऊन सर्व कामकाज पाहणे आवश्यक आहे..या लामजना पाहणी दरम्यान सोबत ग्रह निर्माण अभियंता रवी भावले, लामजना सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, आणि ग्रामरोजगार सहाय्यक सरवदे उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या