आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करुन यांच्यावर कडक कारवाई करावी – वंचित बहुजन आघाडी ची मागणी ..

 आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करुन यांच्यावर कडक कारवाई करावी  – वंचित बहुजन आघाडी ची मागणी ..




औसा प्रतिनिधी 

 

 


औसा (ता. लातूर) – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे  अहेमदनगर चे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल लांडे असे अपशब्दात्मक वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.व महाराष्ट्राचे वातावरण खराब होऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करुन यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी, औसाच्या वतीने तीव्र  आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी औसा तालुक्याच्या वतीने दिनांक 23 जून सोमवार रोजी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष शिवाजी कुंभार, शहराध्यक्ष सद्दाम पठाण, महासचिव इलियास चौधरी, महासचिव सोहेल शेख, उपाध्यक्ष मैजोद्दीन शेख, चांद लोणे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या