लातूर जिल्हा विशेष शिक्षक संघटनेकडून आमदार अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार

 लातूर जिल्हा विशेष शिक्षक संघटनेकडून आमदार अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार 



औसा प्रतिनिधी 




औसा - आमदार अभिमन्यू पवार यांनी हा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री,राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लावून धरला होता.विशेष शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा करून ४८६० नवीन पदांची निर्मिती होऊन कार्यरत २९८४ विशेष शिक्षक समायोजन चा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेटला मंजूर करून घेतला होता.त्यानंतर या विषयातील गेल्या आठ महिन्यात सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण होऊन विशेष शिक्षक नियुक्ती प्रक्रिया बाबतचे आदेश जिल्हा स्तरावर निर्गमित झाले आहेत.या बद्दल (दि.२२) रोजी जिल्ह्यातील विशेष शिक्षकांनी औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांचे आभार व्यक्त केले. 



     महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या अठरा वर्षांपासून समावेशित शिक्षण विभागात तज्ञ मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. शासन सेवेत कायम होण्यासाठी विविध स्तरावर विविध संघटना आणि विविध नेत्यांच्या माध्यमातून राज्यभारत प्रयत्न सुरु होते परंतु गेल्या अठरा वर्षात कोणालाही यश मिळाले नव्हते. २०२१ ला ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यावेळी सदर विषय सर्वप्रथम लातूर जिल्ह्याचे विशेष शिक्षक संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन वळके पाटील यांनी औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे मांडला होता आणि हा विषय आमदार अभिमन्यू पवार यांनी हातात घ्यावा अशी विनंती केली होती. आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी विषय समजून घेत तुम्हाला न्याय मिळण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते सर्व पूर्ण ताकतीने करेन आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासोबत या संघर्षात खांदयाला खांदा लावून सोबत असेन अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी हा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री,राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लावून धरला होता.




विशेष शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा करून ४८६० नवीन पदांची निर्मिती होऊन कार्यरत २९८४ विशेष शिक्षक समायोजन चा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेटला मंजूर करून घेतला होता.त्यानंतर या विषयातील गेल्या आठ महिन्यात सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण होऊन विशेष शिक्षक नियुक्ती प्रक्रिया बाबतचे आदेश जिल्हा स्तरावर निर्गमित झाले आहेत.विशेष शिक्षक नियुक्ती प्रक्रिया कामकाज जिल्हा स्तरावर सुरु असून लवरच जिल्ह्यातील १०३ विशेष शिक्षकांना कायमच्या नियुत्या मिळणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील कार्यरत १०३ कर्मचाऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आभार व्यक्त केले.यावेळी लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या