भादा जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षिका अनिता खडके लिखित उमलती कळी फुलु द्या हो.या नाट्यरूपी पुस्तके चा समावेश शालेय अभ्यासक्रमात..


 भादा जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षिका अनिता खडके लिखित उमलती कळी फुलु द्या हो.या नाट्यरूपी पुस्तके चा समावेश शालेय अभ्यासक्रमात..

औसा प्रतिनिधी 


 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेच्यावतीने समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत अनिता खडके लिखीत" उमलती कळी फुलू दया हा" स्तर नववी, दहावी वर्गासाठी नाटिकारूपी पुस्तकाची निवड झाली आहे . या पुस्तकात समाजातील संवेदनशील आणि महत्वाच्या समस्येला वाचा फोडणाऱ्या या पुस्तकात कुमारवयीन मुलींना शिक्षण घेत असतानाची असुरक्षितता याचे चित्रण या पुस्तकात वाचकाला वाचायला मिळेल . नाटिकेतील पात्रे संवाद आणि घटनाक्रम वाचकांच्या मनाला चटका लावतात . मात्र शेवट हा सक्षमतेकडे नेणारा आहे अतिशय वास्तवतेचे भान ठेवून या पुस्तकाचे लेखन केले असून हे पुस्तक नववी व दहावी वीच्या विद्यार्थ्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून वाचायला मिळणार आहे . या पुस्तकाची छपाई व महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेपर्यंत पोहचण्याचे काम  SCERT च्या मार्फत होत आहे . या हा देशातील पहिलाच प्रयोग असावा कारण ही पुस्तके मराठी हिंदी इंग्रजी उर्दू या चार भाषांत प्रकाशित करण्यात आली आहेत . म्हणून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाच्या प्रक्रियेत ही पुस्तके निश्चीत मदत ठरणार आहेत .

         अनिता खडके अतिशय वास्तववादी लेखिका आहेत त्याचे या अगोदर पाच पुस्तके 95 वे आखिल भारतीय साहित्य सम्मेलन उदगीर या ठिकाणी प्रकाशित झाली आहे . ही सर्व पुस्तके हो शैक्षणिक दृष्टीकोन समोर ठेवूनच लिहीली गेली आहेत .

      अनिता खडके यांचे पाच राष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित आहेत . पाच राष्ट्रीय लेखही प्रकाशित झाले असून .100 ते150 च्या वर वेगवेगळ्या मासिकात त्यामध्ये शासनाकडून चालवल्या गेलेल्या मासिक शिक्षण संक्रमणात सात लेख प्रकाशित आहे . तसेच त्यांनी विद्यार्थ्याच्या शिकवण्यातील अध्यायन करत असताना विद्यार्थाच्या अडचणी लक्षात घेवून आजपर्यंत पाच वेळा राज्यस्तरीय नवोपक्रमात भाग घेतला असून त्यांचा एक नवोपक्रम SCERT च्या वेबसाईटवर प्रकाशित आहे आणि "एक बी उदयासाठी भविष्यासाठी जगण्यासाठी" हा उपक्रमानेच त्यांना 3 जून 2025 पद्मभूषण पद्मश्री डॉ अण्णा हजारे व पद्मश्री राहीबाई पो पेरेयांच्या हस्ते राष्ट्रीय बीजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

  अनिता खडके यांनी आपले अध्यापन आनंदही होण्यासाठी अनेक अभिनव प्रयोग नाटक व्याख्याने निबंध रांगोळी चित्रकला नृत्य कथालेखन कविता लेखन एकपात्री नाटके अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी देवून त्यांच्यातील कला गूणांना वाव दिला आहे . शिक्षण क्षेत्रात अतिशय सृजनशील आगळ्या वेगळ्या उपक्रमात त्या सतत अग्रेसर राहातात म्हणून भादा प्रशालेचे दोन्ही मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व समितीकडून तसेच भादा परिवार कडून शिक्षण परिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या