सहेली योगा क्लासचा शुभारंभ...

 सहेली योगा क्लासचा शुभारंभ...




औसा  प्रतिनिधी

 मानवी जीवनामध्ये आरोग्याच्या रक्षणासाठी योग प्राणायामला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पन्हाळगड कॉलनी याकतपूर रोड औसा येथे सौ सारिका संजय पवार यांच्या संकल्पनेतून सहेली योगा क्लासचा शुभारंभ दिनांक 21 जून रोजी सायंकाळी चार वाजता दीप प्रज्वलन करून करण्यात आला. औसा शहरातील विस्तारित नवीन वस्ती मधील महिला भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करो नित्य रहो निरोग ही संकल्पना उराशी बाळगून सुरू केलेल्या या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सौ वर्षाताई स्वामी, रंजना खुरपे, सौ. रोडगे, सौ. आगवणे, सौ. मित्तल पटवारी यांच्यासह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या