औशात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा..
औसा प्रतिनिधी
दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून देशभरामध्ये साजरा केला जात आहे आरोग्य धनसंपदा हे ब्रीदवाक्य घेऊन निरोगी जीवनासाठी नित्य योग आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक पालक व योगप्रेमी नागरिकांसाठी औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयाच्या सभागृहामध्ये पतंजली योग समितीचे औसा तालुका प्रभारी नेताजी सावंत यांनी अतिशय उत्कृष्टरित्या योग प्राणायाम चे प्रात्यक्षिक करून घेतले कठीण योगासन करून घेतले. नेताजी सावंत यांनी योग प्राण्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल तहसीलदार घनश्याम अडसूळ आणि गटशिक्षण अधिकारी गोविंद राठोड यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या