भोई गल्ली व गांधी चौकातील मेन रोडवर पीव्हीसी पट्ट्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त..

 भोई गल्ली व गांधी चौकातील मेन रोडवर पीव्हीसी पट्ट्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त..




औसा प्रतिनिधी 


औसा शहरातील जामा मस्जिद चौकातून भोई गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मेन रोडवर पीव्हीसी ब्लॉकच्या पट्ट्यांची योग्य बसवणूक करण्यात आलेली नाही. यामुळे त्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होत आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.


याचप्रमाणे गांधी चौक येथील रोडवर अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचे किंवा अपूर्ण पीव्हीसी ब्लॉक बसवण्यात आले नसून, यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या समस्येकडे मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित ठिकाणी योग्य पीव्हीसी पट्ट्यांची बसवणूक करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना कळविले होते.त्या अनुषंगाने आज रोजी

जामा मस्जिद चौक भोई गल्लीत जाणा-या रोडवरील व गांधी चौकातील मेन रोडवर पीव्ही ब्लॉग यांनी पट्या बसविण्यात आले आहेत. त्याबद्दल औसा शहरातील अशा समस्या आपल्या समोर आम्ही मांडत आहोत यामुळे आम्ही पुढील काळात आपण असेच लक्ष देऊन करताल अशी अपेक्षा बाळगतो मुख्याधिकारी साहेबांना अभिनंदन आभार.सय्यद मुजफ्फर अली इनामदार एम आय एम औसा प्रमुख तसेच अनेक शहरात अशा समस्या आहेत त्याकडे आपण लक्ष द्यावे अशी आशा बाळगतो.

त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या