अजीम विद्यालयात प्रवेशोत्सव व पाठयपुस्तकांचे वितरण उत्साहात करण्यात आले.....
...
आज दि. 16/06/2025 शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात उत्साहात व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पालकांच्या उपस्थित प्रवेशोत्सव व पाठय पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास सुलेमान अफसर शेख साहेब (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, लातूर ग्रामीण) यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुछ देवून स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रदीप जी मोरे (राष्ट्रवादी औसा शहराध्यक्ष) यांच्या हस्ते शाळेतील विदयार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेख निजामोद्दीन साहेब यांनी उपस्थित पालक- नासेर पटेल, हाजी मैनोद्दीन पठाण, हाफेज अय्युब भाई व मदार कोतवाल यांचा स्वागत व सत्कार पुष्पहाराने करण्यात आला.
तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री. शेख टी. एम., श्री. मेटे एस. व्ही., डॉ. खलील सिद्दीकी आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित राहून प्रवेशोत्सव व पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
0 टिप्पण्या