जागतिक योग दिन अजीम विद्यालयात संपन्न.....
औसा प्रतिनिधी
दि. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले, त्यासाठी योग प्रशिक्षक म्हणून श्री. माळी विठ्ठल हणमंत हे उपस्थित होते, सध्या ते योगासन व मल्लखंब साठी विद्यापीठात प्रतिनिधित्व करतात..अतिशय सुंदररीत्या जीवनात योगाचे महत्व सांगून आमच्या शिक्षक व विद्यार्थ्याकडून योगाचा सराव करून घेतला, यासाठी क्रीडा शिक्षक शेख मुजम्मील समदानी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या योग दिनी संस्था अध्यक्ष संजय जी कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री. मेटे एस. व्ही., डॉ खलील सिद्दीकी यांच्या हस्ते योग प्रशिक्षक माळी विठ्ठल यांचा शाल, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अजीम माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते,
अशा प्रकारे अजीम विद्यालयात उत्साहात जागतिक योग दिवस संपन्न झाला.
0 टिप्पण्या