सायकलिस्ट क्लबच्या पर्यावरण पूरक विठ्ठल वारीचे औसा येथे उत्स्फूर्त स्वागत...
औसा प्रतिनिधी
सायकलिस्ट क्लब लातूरच्या वतीने पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी लातूर ते पंढरपूर 200 किलोमीटर अंतराच्या सायकली वरून निघालेल्या विठ्ठल वाडी चे औसा येथील तुळजापूर टी पॉइंट येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सायकलिस्ट क्लबच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत 150 सायकल विराणी पंढरपूर वारीचा उपक्रम सुरू केला असून उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. सर्वश्री भागवत खोत, वेंकुराम गायकवाड, रितेश अवस्थी आणि पोलीस खात्यातील विठ्ठल भक्त घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 20 जून रोजी सकाळी सहा वाजता औसा येथील तुळजापूर टी पॉइंट येथे ही वारी आल्यानंतर औसा येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश अप्पा ठेसे, विजयकुमार मिटकरी, व्यंकट जाधव, संजय शिंदे, राजाभाऊ मोरे, बालाजी जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, पत्रकार राम कांबळे यांनी विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या सायकल वीरांचे स्वागत केले वारीत सहभागी झालेल्या विठ्ठल भक्तांना शेंगदाण्याचे लाडू, पाणी बॉटल देऊन प्रोत्साहित केले, सायकलिस्ट क्लबच्या वतीने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातून पाच हजार सायकल वीर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणार असल्याची माहिती पोलीस दलातील विठ्ठल भक्त घुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
0 टिप्पण्या