अफसर शेख युवा मंच च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

 अफसर शेख युवा मंच च्या वतीने गुणवंतांचा सत्कार 



*डॉ. अफसर शेख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अफसर शेख युवा मंच, औसा यांच्या वतीने 10 वी- 12 वी बोर्ड परीक्षेतील व डॉक्टर्स इंजिनियर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा.*


दर वर्षी प्रमाणे या वर्षीही इ.10 वी व इ.12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा अफसर शेख युवा मंच, औसा यांच्या वतीने नगर परिषद सांस्कृतिक सभागृह औसा येथे उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात औसा शहर व परिसरातील 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेतील व  डॉक्टर्स इंजिनियर गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सन्मान पत्र, सन्मान चिन्ह व रेनकोट देऊन डॉ. अफसर शेख साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शनही करण्यात आले. डॉ शेख बोलताना म्हणाले की दरवर्षी अफसर शेख युवा मंच नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते, विद्यार्थ्यांना बॅग वह्या,दिवाळी आणि ईद सण ला भेट वस्तू,क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर असे उपक्रम दरवर्षी घेतले जातात. आज गौरव करण्यात आलेले विद्यार्थी उद्याचे डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रशासक आणि समाजसेवक असतील. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

या कार्यकर्मातून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन डॉ असीम काझी,पोलीस स्टेशनचे 

API श्री प्रमोद बोंडले, व आवेझ सिद्दीकी यांनी केले 


या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून औसा पोलीस स्टेशनचे 

API श्री प्रमोद बोंडले, NBS फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री असीम काझी, अल्फला क्लासेसचे संचालक श्रीआवेज सिद्दिकी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कोळपे, शहर अध्यक्ष श्री प्रदीप मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री.सुलेमान शेख, मा.नगराध्यक्ष श्री मेहराज शेख, मा.नगराध्यक्षा सौ.कीर्तीताई कांबळे,मा.सभापती श्री.गोविंद जाधव, श्री नजीर शेख,श्री साजिद काझी,विनायक सूर्यवंशी,मा.नगरसेवक श्री रुपेश दूधनकर, श्री बालाजी शिंदे,श्री युवराज कसबे,श्री संतोष चव्हाण, मुकेश तोवर,श्री अमर रेड्डे,श्री गणेश माने, श्री गजेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री वकील इनामदार,श्री समीर पठाण,श्री हकीम सय्यद यांनी जबाबदारी पार पाडली.

सदरील कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या