एच एस सी परीक्षेत श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे उज्वल यश..
.
औसा प्रतिनिधी
श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षेत बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून तीन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह आणि 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. बारावी कला शाखेचा निकाल 84 टक्के लागला असून दोन विद्यार्थी विशेष प्राविण्यासह आणि 19 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, डॉक्टर बसवराज पटणे, रविशंकर राचट्टे,रवींद्र कारंजे, प्रभू आप्पा माशाळे, सतीश गारठे, अभिजीत उटगे ,विजयकुमार मिटकरी, प्राचार्य शरणाप्पा जलसक्रे, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या