औसा शहराचा बायपास झाला परंतु पुलाला मात्र मुहूर्त मिळेना ..
औसा प्रतिनिधी
औसा शहरात अद्याप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर उड्डाणपूल न झाल्यामुळे अप्रोच रोड चौकामध्ये सतत वाहतुकीची कोंडी होत असून सातत्याने अपघात होत आहेत मागील महिन्यामध्ये दोन जणांना या ठिकाणी प्राण गमवावा लागला शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून बीएसएनएल कार्यालय पोलीस क्वार्टर पासून कारंजे खडी केंद्र पर्यंत पर्यायी रस्ता हॉट मिक्स मजबुतीकरण करण्यात आले आहे परंतु होळकर नगर तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या मराठा समाजाच्या स्मशान भूमी जवळील नाल्यांमध्ये पुलाचे काम अर्धवट ठेवले आहे या ठिकाणी पुलाचे बांधकाम करून नाल्या टाकल्या आहेत परंतु उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार अशी चर्चा सुरू आहे पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अद्याप सुरळीत झाला नाही पुलाचे काम राहिल्यामुळे या मार्गावरून लोक आपली वाहने घेऊन जाण्यासाठी कचरत आहेत औसा शहरापासून कारंजे खडी केंद्रापर्यंतच्या या बायपासवरील रखडलेल्या या पुलाचे काम तातडीने करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
0 टिप्पण्या