मुख्तार कुरेशी शेठ-आपुलकीचं नातं जपणारं व्यक्तिमत्व.*

 *मुख्तार कुरेशी शेठ-आपुलकीचं नातं जपणारं व्यक्तिमत्व.*


मुख्तार कुरेशी शेठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक,जनतेच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करणारे आणि आपल्या संवेदनशील मनाने समाजाच्या विविध स्तरांमध्ये आपले वेगळेपण जपणारे हे व्यक्तिमत्त्व.आज मुख्तार कुरेशी शेठ यांचा वाढदिवस या निमित्ताने मनापासून शुभेच्छा.

     मुख्तार शेठ म्हणजे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता जनसामान्यांच्या सुख-दुःखात आपुलकीने सहभागी होणारा माणूस.नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विकासकामे करताना कधीही आपले माणूसपण हरवले नाही. त्यांच्या वागण्यातली सहजता आणि नम्रता, हीच त्यांची खरी ओळख आहे.

      त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे मासे पालन आणि विक्रीचा. या व्यवसायातूनच त्यांनी कष्टाची किंमत आणि जमिनीशी नातं काय असतं, हे उभ्या आयुष्यात शिकून घेतलं. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांना रोजगार दिला आणि माणुसकीची नाळ अधिक घट्ट केली.

     मुख्तार शेठ यांचे वडील पै.जाफरसाब कुरेशी आणि माझे आजोबा पै.इब्राहिम सरगुरु साहेब यांच्यात आपुलकीचं नातं होतं.त्या काळात एकमेकांशी असलेली ती जिव्हाळ्याची नाती आजही आमच्या आठवणीत जपलेली आहेत.विशेष म्हणजे,माझी आई मुख्तार शेठ यांच्यासाठी मोठ्या बहिणीच्या स्थानावर होत्या आणि शेठ आजही ती बहीणपणाची ओढ जपतात,आम्हाला प्रेमाने विचारपूस करतात.म्हणून हे जिवाभावाचं नातं केवळ रक्ताचं नव्हे,तर माणुसकीच्या गाठीने बांधलेलं आहे.तसेच मुख्तार शेठ यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शायरीप्रेम.शब्दांच्या ओघात ते मनातलं भावविश्व व्यक्त करतात.त्यांच्या शायरीत एक हळवेपण असतं,प्रेम असतं आणि समाजाविषयीची तळमळ असते.त्यांची शायरी म्हणजे त्यांच्या मनाचं प्रतिबिंब.कधी आशावादी,कधी भावूक पण नेहमीच मनाला भिडणारी.“गुलाबासारखं हसणं,काट्यासारखं ठाम उभं राहणं

हे शिकवलं आयुष्याने,पण तरीही शायर राहिलो मी”अशी त्यांची शायरी जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक नजर देते.वाढदिवसानिमित्त माझ्या या मामाच्या सर्व गुणांना सलाम करत,त्यांना दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य आणि अजून अनेक वर्षं समाजासाठी कार्य करण्याची शक्ती लाभो,हीच अल्लाह जवळ दुवा.

*व्यक्तीविशेष-ऍड.इकबाल शेख/औसा. Mo.9545253786*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या