आजोबा मित्र मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी..
औसा प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आजोबा मित्र मंडळाच्या वतीने पाटील गल्ली औसा येथे मराठा समाजाचे महंत राजेंद्र गिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड परीक्षित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण व धर्मवीर संभाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. पाटील गल्ली औसा येथे आयोजित कार्यक्रमासाठी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, मराठा समाजाचे प्रदीप मोरे, सराफ असोसिएशनचे सतीश नाईक, सुवर्णकार समाजाचे वसंत महामुनी, माळी समाजाचे सचिन माळी यांच्यासह शहरातील विविध अनेक समाजाचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वश्री सिद्धेश्वर गवळी, हनुमंत कांबळे, युवराज चव्हाण, लिंबराज जाधव, एल टी चव्हाण, अंगद कांबळे, सौ. कल्पना डांगे, राहुल चिकनाळे, गोविंद मलवाड, मुन्ना साखरे, सिद्धेश्वर सुरवसे, भाजपाचे गटनेते सुनील उटगे ,शहराध्यक्ष शिवरुद्र मुर्गे, शहर प्रमुख व्यंकटेश कोद्रे, आणि सुरेश दादा भुरे, युवा उद्योजक हनुमंत राचट्टे ,माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे आणि भरत सूर्यवंशी, अशोक कुंभार, गोपाळ धानोरे, जयंती समितीचे अध्यक्ष अलीम तांबोळी, वसंत लोंढे, यांच्यासह पाटील गल्ली, धनगर गल्ली, ब्राह्मण गल्ली, कुंभार गल्ली येथील अनेक नागरिक उपस्थित होते. जयंती समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सायंकाळी सात वाजता दक्षिणमुखी वीर हनुमान मंदिरापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये धर्मवीर संभाजी प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या