विरभद्रेश्वर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार...

 विरभद्रेश्वर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार...



औसा प्रतिनिधी 

एस. एस. सी.  बोर्ड परीक्षेत औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेचा निकाल 96.o7% लागला आहे.  त्यामुळे यशस्वी गुणवंतांचा सत्कार श्री विरभद्रेश्वर प्रशालेत करण्यात आला.  अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष वैजनाथप्पा ईळेकर होते. 

 यावेळी संस्था सचिव डाॅ. सी. एस. तोडलगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे, कोषाध्यक्ष युवराज हालकुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सत्कार समारंभात शाळेतून सर्वप्रथम  कु. तौर अनुष्का ज्ञानेश्वर गुण 99% , द्वितीय पठाण अमन आयुब गुण 96.80% , तृतीय कु. म्हेत्रे पल्लवी भागवत गुण 94% , मुरडे कुणाल गोविंद गुण 92% , भुसणे विशाल बसवेश्वर गुण 91% , फुलमाळी प्रणिता मंगेश गुण 90.20% , फरकांडे प्रीती दगडू गुण 89.80% , बिडवे श्रीशैल्य धनराज गुण 88.60% , मुदगडे आरती संतोष गुण 88%, डावकरे शशी शिवराज गुण 87.80% , भुसे आनंदी अमित गुण 85.60% , चांदुरे श्रुती मोतीराम गुण 85.60 यांचा सत्कार करण्यात आला. 

  या शाळेतून विशेष प्राविण्यासह 17 , प्रथम श्रेणीत 16, व्दितीय श्रेणीत 7 , तृतीय श्रेणीत 3 विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.  या सत्कार सोहळ्यासाठी गुणवंतांचे पालक,  शाळेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे, विश्वनाथ केवळराम,   सदाशिव कांबळे, चंद्रशेखर हलमडगे,  शिवाजी वैद्य, बालाजी सोळुंके,  दिलीप राठोड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या