भजन संम्राटांची अभंगवाणी रसिकांना मिळणार मेजवानी

 भजन संम्राटांची अभंगवाणी

रसिकांना मिळणार मेजवानी


____________________


औसा  प्रतिनिधी

दि. 6 एप्रिल 2025

       औसा  तालुक्यातील किनी थोटे येथील हरिनाम सप्ताह आणि शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त बुधवारी मंदिरात भजनसम्राट पं. बाळासाहेब  वाईकर आणि पं. जगन्नाथ वाडेकर यांच्या अभंगवाणी कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना मिळणार असून त्यांना तबल्याची साथ राजगोपाल गोसावी यांची तर  नंदकुमार भांडवलकर हे पखावाजाची साथसंगत करणार आहेत.

        या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील, उद्योगपती दत्तात्रय मारणे, पं. विठ्ठलराव जगताप, पं. शिवरूद्र स्वामी, पं. वेदांग धाराशिवे, अँड. मुक्तेश्वर वागदरे, संपादक राजू पाटील, किरण अप्पा उटगे, संतोष मुक्ता, विजयकुमार धायगुडे, भाऊसाहेब रायते यांच्यासह सर्व क्षेत्रातील रसिकांची उपस्थिती राहणार आहे.

     या अभंगवाणी कार्यक्रमाचा परिसरातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शास्त्रीय  गायक पं. रमेश भुजबळ आणि महादेव मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या