*जेष्ठ पत्रकार कबीर सर मनमिळाऊ हसमुख व्यक्तिमत्व....*
(शेख समद संपादक, सा.मु वि परिषद लातूर)
"सतत सत्याच्या शोधात, समाजप्रबोधनासाठी समर्पित लेखणी आपल्या अनुभवाने पत्रकारितेला दिलेले योगदान अमूल्य आहे.
मुहम्मद मुस्लिम मुहम्मद अय्युब कबीर जन्म 06/04/1966 ,औसा जि. लातूर
शिक्षण एम ए. डी एड. व पत्रकारिता पदविका शिक्षणाचे माध्यम उर्दू
व्यवसाय 1984 पासून स्थानिक" हज़रत सूरत शाह उर्दू प्रा.स्कूल औसा जि. लातूर येथे सह शिक्षक म्हणून सेवारत..छंद 1984 साला पासून मराठी, हिंदी आणि उर्दू वर्तमान पत्रात व मासिक, त्र्य मासिकांतून लिखाण, स्थानीय वर्तमानपत्रातून " कबीर वाणी " सदराच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय विश्लेषण..अनेक उर्दू वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेत शायरी ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी साठी सदैव सज्ज
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे
पुरस्कार विविध शासकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटना मार्फत मिळालेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या पैकी उल्लेखनीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या राज्य उर्दू साहित्य अकादमी चे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार 2017 महाराष्ट्र उर्दू साहित्य परिषदेचा " मौलाना आझाद उर्दू पत्रकारिता पुरस्कार 2016 महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना चे राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 खादिमाने उम्मत नांदेड मार्फत राज्य स्तरीय " आफताब ए सहाफत " पुरस्कार 2022 सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वतीने पत्रकारिता पुरस्कार 2023 मनोगत प्रतिष्ठान चे आदर्श शिक्षक पुरस्कार 2000 सा. लातूर रिपोर्टर चे "अड.मुजीबुद्दीन पटेल जीवन गौरव पुरस्कार" 2018
मुस्लिम विकास परिषद लातूर चे " शहीद टिपू सुलतान पत्रकारिता पुरस्कार 2015 ...
लातूर जिल्हा शिक्षक काँग्रेस चे " जीवन गौरव पुरस्कार" 2012
नामावंत संस्था व विविध पुरस्कार प्राप्त तसेच हिंदी भी उत्तम है उर्दू भी आला है हिंदू उर्दू सुप्रसिध्द कवियत्री लता हया यांच्या हे ओळी मा मुस्लीम कबीर साहेब यांना तंतोतंत लागू होतात.
खरं म्हटलं तर मुस्लीम कबीरजी हे साधे सरळ स्वभावाचे " आदर्श शिक्षक " व उर्दू , मराठी , हिंदीचे
गाढे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार !
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात
काम करत करत ते सतत समाज सेवा करीत राहिले निवृत्त होईपर्यंत. ।
आता निवृत्त झाल्यानंतर ते पुन्हा सामाजिक, शैक्षणिक, उर्दू-हिंदी साहित्य क्षेत्रात जोमाने काम करण्यासाठी मोकळे झाले आहेत. हे मुस्लिम समाजासाठी एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. हिंदी कवी संमेलन असो, मराठी साहित्य संमेलन असो , किंवा उर्दू कवी संमेलन, नाट्य स्पर्धा व उर्दूचे इतर कार्यक्रम असो मुस्लीम कबीर साहेब हे नेहमी उत्तम व आला मार्गाने त्यांचे नियोजन करून ते कार्यक्रम यशस्वी करून दाखवितात. महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातील उर्दू हिंदी - मराठीच्या ज्येष्ठ सुप्रसिध्द कवींचा , पत्रकारांचा दांडगा संपर्क असल्याने ते अनेकांचे विविध प्रकारचे कार्य करण्यात नि :स्वार्थ पणे पुढे पुढे असताना मी पाहिले .
.सोलापूर, पुणे, बीड उस्मानाबाद , लातूर 'इत्यादी ठिकाणी उर्दूच्या साहित्यिक व सांस्कृतिक तथा पत्रकारितेचे कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्याचे भुकलेल्या लोकांची साहित्यक भूक भागवीतात .
शिक्षण क्षेत्रात एका उच्च जबाबदारीच्या पदावर काम करीत असताना साहित्यकांची सेवा करणं हे आमच्यासारख्या लोकांना चकित करणारे असले तरी मुस्लीम कबीर सर हे काम अत्यंत नम्रपणे करीत होते व आता पुन्हा जोमाने उर्दू हिंदी सेवा करण्यासाठी सदैव तयार आहेत .
हे आजच्या युवा पिढीसाठी एक
चांगली देणगी म्हणावी लागेल.
शिक्षकांच्या अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वाचे व रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावल्याने ते चांगले शिक्षक नेते म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली .आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपले आरोग्य, आयुष्य आणि यश सदैव वृद्धिंगत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
0 टिप्पण्या