कॉम्प्युटर पार्क येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा *दिशा समितीच्या सदस्या जयश्रीताई उटगे यांचा सत्कार करण्यात आला.*

 कॉम्प्युटर पार्क येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा 

 *दिशा समितीच्या सदस्या जयश्रीताई उटगे यांचा सत्कार करण्यात आला.* 


औसा प्रतिनिधी-कॉम्प्युटर पार्क औसा येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिशा समितीच्या सदस्या जयश्रीताई उटगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  जयंती समितीचे अध्यक्ष अजय शेटे, वीरशैव समाजाचे उपाध्यक्ष वैजिनाथ शेंदुरे, जयंती समितीचे सचिव प्रसन्न राच्चट्टे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे,  यावेळी योगेश षटकार प्रणव नागराळे, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संभाजी शिंदे, पत्रकार राम कांबळे, एस. ए. काझी, गिरीधर जंगाले यांच्यासह जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या