नाथषष्ठी महोत्सवासाठी नाथांच्या पालखीचे आयोध्यास प्रस्थान
..........................................
औसा दि. १०.(अड.शाम कुलकर्णी)
............................................
सद्गुरू श्री विरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा द्वारा संचलित २२८ व्या श्रीनाथषष्ठी महोत्सवाकरिता सोमवार १० मार्च रोजी श्रीनाथांच्या पालखीचे आज नाथ मंदिरात विशेष पूजन सोहळा व आरती होऊन दुपारी चार वाजता आयोध्यास प्रस्थान झाले.
नाथ मंदिरात सकाळी अभिषेक
महापूजा संपन्न झाली तदनंतर चक्रीभजनाची सेवा नाथांसमोर रुजू झाली व ठीक चार वाजता नाथ संस्थांनचे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते नाथांचे पुन्हा पूजन व आरती होऊन नाथषष्ठी साठी नाथांच्या व सद्गुरूंच्या जयघोषात पालखी प्रस्थान सोहळा संपन्न झाला
यावेळी सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री गोरखनाथ महाराज औसेकर, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज,
ह भ प . श्री श्रीरंग महाराज ,ह भ प
श्री ज्ञानराज महाराज, सौ नीता वहिनी गोरखनाथ महाराज, श्री श्रीनाथ महाराज, हे महाराज कुटुंबीय व पालखीसोबत आणि सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या समवेत निघालेले सदभक्त उपस्थित होते.
दिनांक 16 मार्च ते 23 मार्च या दरम्यान श्रीक्षेत्र आयोध्या येथे राम लल्लाच्या पावन भूमीत सात दिवस नाम संकीर्तन प्रासादिक चक्रीभजन राम प्रभू चे दर्शन ज्ञानेश्वरी पारायण धर्मसभा , काशी जगद्गुरु, संत महंत
यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे एकूण जवळपास
दोन हजार भाविक नाथषष्ठी साठी
रेल्वे कार विमान आणि ट्रॅव्हल्स ने रवाना होत आहेत. दिनांक 23 मार्च रोजी दहीहंडी गोपाळकाला होऊन 228 व्या नाथ षष्ठी महोत्सवाची आयोध्या क्षेत्र सांगता होणार आहे.
0 टिप्पण्या