महिलांनी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे....अंजली मसलकर
स्वयं शिक्षण व स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनीत जागतिक महिला दिन साजरा
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील स्वयं शिक्षण प्रयोग व स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी आयोजित कार्यक्रमात बोलताना अंजली मसलकर म्हणाल्या की महिलांनी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सक्षम होऊन त्यातून जीवनात स्थैर्य प्राप्त करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या.
स्वयं शिक्षण समूह व स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उद्योगात यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या महिलाचे अनुभव कथन घेण्यात आले. महिलांमधील संघर्ष कसा आहे व पुढे संघर्ष कसा करायचा याबद्दल अनुभवाची देवाणघेवाण याबद्दल सखोल माहिती देण्यात आली. महिला हि स्वावलंबन कशी झाली पाहिजे तसेच सेंद्रिय शेती प्रशिक्षण व्यवसायाबद्दल माहिती स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी व स्वयं शिक्षण प्रयोग अंतर्गत महिलांना याप्रसंगी देण्यात आली.ही स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था देशातील 7 राज्यांमध्ये काम करत असून जवळपास 3लाख 65हजार महिलांसोबत घेऊन काम करत असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.यावेळी अंजली मसलकर, सुमित्रा जाधव, मिरा साठे यांच्या सह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या