नागरसोगा येथे अचानक आग लागल्याने दोन घरांचे लाखोचे नुकसान..
औसा प्रतिनिधी
तालुक्यातील नागरसोगा येथील सुधाकर पांडुरंग माळी आणि मनोज दिलीप जगताप यांच्या घरास ७ मार्चच्या मध्यरात्री अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे घरातील फ्रिज, टीव्ही, कुलर, पंखे, मोटरसायकल घरगुती किराणा धान्य तसेच शेतातील कामासाठी लागणारे कृषी अवजारे पाईप इत्यादी अंदाजे पाच लाख रुपये चे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहिती तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात समोर आली आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती कळताच तलाठी यांनी उपसरपंच बंडू रामराव मसलकर, काशिनाथ विश्वनाथ सूर्यवंशी, शिवाजी बाबुराव शिंदे, सौदागर बलभीम माळी आणि भास्कर चंद्रभान सूर्यवंशी या पंचा समक्ष पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालय औसा यांच्याकडे सादर केला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन घरे भस्मसात झाल्यामुळे दोन कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.
0 टिप्पण्या