प्रा . वेंकट घोडके यांना उद्योग-अकादमिक सहयोगात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान
पुणे – एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे (AISSMS IOIT) येथील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तसेच प्रशिक्षण व स्थाननियोजन अधिष्ठाता (Dean Training and Placement) प्रा. वेंकट घोडके यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे.
त्यांनी १३ पुस्तके लिहिली असून, त्यांचे ४ पेटंट मंजूर झाले आहेत आणि ४ पेटंट प्रकाशित झाले आहेत. तसेच, त्यांचे ५४ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानामुळे विद्यार्थी व अकादमिक क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
अलीकडेच, महाराष्ट्र टी.पी.ओ डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२५ दरम्यान त्यांना उद्योग-अकादमिक सहयोगातील उत्कृष्ट योगदानासाठी "Excellence in Industry-Academia Collaboration" पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या