तहानलेल्या हरिणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

 तहानलेल्या हरिणीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू 


औसा _लातूर रोडवरील बुधोडाजवळ पाण्यासाठी तहानलेली व कळपातून वाट चुकून रस्त्यावर आलेल्या हरिणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत झाली आहे.शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली असता सदरील हरिणी जबर जखमी अवस्थेत होती.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या हरिणीस औसा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान हरिणीचा मृत्यू झाला.वाहनाच्या धडकेत हरिणीच्या दोन्ही पायांना जबर मार लागला होता हरिणीला  वनविभागाच्या वाहनातून पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले परंतु,अतिरक्तस्रावाने या हरिणीचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अमर चाटे यांनी सांगितले.वनपरिक्षेत्र अधिकारी

पोट्टे,वनअधिकारी पांडूरंग चिल्ले,वनरक्षक डी.एस कांबळे आदींनी या हरिणीच्या बचावासाठी प्रयत्न केले.

∆ सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पशु पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.पाण्याच्या शोधात पशुपक्षी रस्त्यावर येतात आणि अशा प्रकारे अपघातात त्यांचा मृत्यू होतो.

∆ वन विभागाच्या वतीने पशू पक्ष्यांसाठी पशू प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आली असून वनरक्षक  प्राण्यांच्या रक्षणासाठी सातत्याने दक्ष राहून काम करत असल्याचे वनअधिकारी पांडुरंग चिल्ले यांनी सांगितले.


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या