औसा नगर परिषद पथ विक्रेता समिती निवडणुक २०२५ बिनविरोध.
.
औसा प्रतिनिधी
औसा नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या पथविक्रेता समिती 2025 च्या निवडणुकीत,खुंदमिर मुल्ला यांच्या मार्गदर्शना खाली औसा शहर पथ विक्रेता विकास पॅनलचा बिनविरोध विजय झाला. यामध्ये बिनविरोध झालेल्या सदस्य पुढील प्रमाणे, नियामत मुस्तफा लोहारे( सर्वसाधारण गट )गौसोद्दीन बशीरसाब जर्दी ( सर्वसाधारण गट )
संतोष अंकुश कांबळे( अनुसूचित जमाती एस टी गट )
भानुदास बाबुराव कोळी ( अनुसूचित जमाती एस टी गट )जुबेर मुजिब बागवान ( इतर मागासवर्ग ओबीसी )
सौ मंजू प्रकाश कांबळे( सर्वसाधारण महिला गट )
श्रीमती लक्ष्मी दिलीप सावळकर ( दिव्यांग महिला गट)
सौ जी,आर हन्नुरे( अल्पसंख्यांक महिला गट )या बिनविरोध विजयी झाले या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री दीपक भराट, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, यांच्या हस्ते बिनविरोध आलेल्या सदस्याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये पथ विक्रेता सदस यांच्या कामाविषयीची माहिती व निवडणूक विषयक कामामध्ये अकबर शेख यांनी व शिवलिंग कांबळे यांनी सहकार्य केले. मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांच्यातील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक भराट यांचा सत्कार करण्यात आला व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी खादर सय़्यद, पाशाभाई शेख, नजीर बागवान, रफीक हन्नुरे,आदिची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या